गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi)

गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi)


Unabridged

Sale price $1.98 Regular price$3.95
Save 50.0%
Quantity:
window.theme = window.theme || {}; window.theme.preorder_products_on_page = window.theme.preorder_products_on_page || [];

२०११ हे वर्ष पूज्य गुरुदेवांनी जागृती वर्ष म्हणून घोषित केले आहे. हे वर्ष साधकांना आपल्या आध्यात्मिक स्थितीचे निरीक्षण करण्याची, आत्मचतिंन करण्याची एक सुवर्णसंधी आहे.

मागील पाच वर्षांपासून पूज्य गुरुदेव दरवर्षी समर्पण आश्रम, दांडीमध्ये गहन ध्यान अनुष्ठान संपन्न करत आले आहेत आणि या ४५ दिवसांसाठी ते एकांतात ध्यानाच्या उच्च अवस्थेत राहून प्रत्येक साधक साधिकांच्या स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करत असतात व सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी या उद्देशाने गुरुशक्तींकडून आलेले संदेश वेळोवेळी लिखित स्वरूपात पाठवत असतात.

प्रत्येक साधकाने आपल्या स्वत:चे गुरू बनावे, प्रत्येक साधकाने आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत ह्याच जीवनात मोक्षाची स्थिती प्राप्त करावी, या उद्देशाने पूज्य गुरुदेवांनी आपल्या लिखित संदेशांच्या माध्यमातून अनेक विषयांवर, जसे की व्यक्तीच्या शरीरापासून शक्तीकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे, आत्मचिंतन, सामूहिकतेचे महत्त्व, चैतन्याची गंगा, आत्मचित्तातून आत्मजागृती, आत्म्याची आत्मीयता, गुरुशक्तिधाम तसेच जिवंत कल्पवृक्ष, विस्तृत मार्गदर्शन केले आहे.

हे पुस्तक वरील संदेशांचे संकलन आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वाचक ह्या पुस्तकाच्या वाचनाने नक्कीच लाभान्वित होतील.