Manokalp Diwali Ank 2024

Manokalp Diwali Ank 2024


Unabridged

Sale price $0.38 Regular price$0.75
Save 50.0%
Quantity:
window.theme = window.theme || {}; window.theme.preorder_products_on_page = window.theme.preorder_products_on_page || [];

दिवाळी अंकाचा विषय 'संवाद' आहे, कारण हेच बघा ना, तुम्ही-आम्ही एकमेकांशी संवाद साधतो? उत्तर सोपे आहे. बोलूनच संवाद साधतो, बरोबर आहे. म्हणजेच काय आपलं बोलणं, वागणं, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे आपोआप सतत होत असतं. उदाहरण बघायचं झालं तर जेव्हा संध्याकाळ होते आणि दिवस मावळायला लागतो, तेव्हा आपल्याला कोणी सांगत नाही, पण एकंदरित वातावरण कळत-नकळत आपल्याला सांगतं की, आता संध्याकाळ होत चालली, तुम्ही तुमच्या घरी परत जा. म्हणजेच काय झालं? तर हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन झालं. निसर्गही कळत-नकळत आपल्याशी संवाद साधत असतो. तो दोन्ही प्रकारचा असतो. एक व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. आपण व्यक्त होताना भाषेचा किंवा वेगवेगळ्या खाणाखुणांचा वापर करतो. कळत-नकळत आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. म्हणजे काय, संवाद खूप महत्त्वाचं काम करतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ता संवादच असा आहे की, जो प्रत्येकाच्या नात्यांमध्ये चांगला असला तर नाती घडतात, अधिक दृढ होतात, सगळ्याच गोष्टी आनंददायक ठरतात. तर संवाद बिघडलेला असेल तर नातीही बिघडलेली असतात. म्हणूनच संवाद कसा असावा तो कशा प्रकारे होऊ शकतो, संवादाचे वेगवेगळे रूप आणि संवादाचे वेगवेगळे टप्पे यांचा परामर्ष घेण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. आजकाल एकीकडे दिवसेंदिवस ताण-तणाव वाढत चालले असताना वेळीच व्यक्त होणं गरजेचं ठरत आहे. त्याच वेळी दुसरीकडे दिवसेंदिवस संवाद हरवत चालला आहे. याचे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यादृष्टीनेही संवादाचं महत्त्व लक्षात घ्यायला हवं.

नेहमीप्रमाणे आपल्याकडे मान्यवर लेखकांची पर्वणीच असते. तशी ती आपल्याला या वर्षीच्या अंकातही बघायला मिळणार आहे. या अंकात १२ सेलिब्रिटींच्या मुलाखती आपल्याला वाचायला मिळतील. शिवाय संवाद विषयावरील १७ लेख, शिवाय जोडीला ललित विभाग आहेच, शेवटी काय? या दिवाळीत आपण आपल्या सुसंवादावर काम करायचं. संवादातून गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारी नकारात्मकता झटकून टाकून नाती अधिक दृढ करू या. म्हणजेच काय, तर या दिवाळीत सुसंवादाचा वैचारिक फराळ अनुभवायचा आणि समाधानाच्या प्रकाशानं जीवन उजळून टाकायचं.

आपली

अपर्णा चव्हाण