Aakash Doot Galileo (Marathi)

Aakash Doot Galileo (Marathi)


Unabridged

Sale price $6.00 Regular price$12.00
Save 50.0%
Quantity:
window.theme = window.theme || {}; window.theme.preorder_products_on_page = window.theme.preorder_products_on_page || [];

आकाशदूत गॅलिलिओ

खगोलशास्त्राचे संदेशवाहक

महान वैज्ञानिकाची जीवनगाथा

आपण किती वर्षे जगलो यावरून आपल्या जीवनाची यशस्विता मोजता येत नाही; तर जीवनात आपण विश्वासाठी किती सार्थक कार्य करू शकलो यावरूनच आपले जीवन कितपत यशस्वी होते, हे निर्धारित होते.

जगात आपल्याला मान मिळो वा आपला अपमान होवो… यश मिळो अथवा अपयश… काहीही झालं तरी मनुष्याला त्याच्या प्रतिभेचा आणि ज्ञानाचा पूरेपूर सदुपयोग करण्यात मागे हटता कामा नये, ही प्रेरणा गॅलिलिओंच्या जीवनातून तुम्हाला मिळेल.

गॅलिलिओ हे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यांना भलेही अनेक वर्षांनंतर सन्मान दिला गेला, ज्या सन्मानावर त्यांचा वास्तवात अधिकार होता. पण गॅलिलिओ यांची जीवनगाथा वाचकांना हा संदेश अवश्य देते, की 'खरा शोध कधीही वाया जात नाही.' हा शोध जगाला कधी ना कधी स्वीकारावाच लागतो. म्हणून कित्येक शतकांनंतरही गॅलिलिओ हे त्यांच्या महान वैज्ञानिक कार्यांसह व शोधांच्या रूपात आजही अजरामर आहेत आणि पुढेही राहतील.