
Stree Jivnachi Gatha
रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांत भारतीय संस्कृतीची गूढता,
नीती, धर्म आणि मानवी जीवनाचे विविध पैलू गुंफलेले आहेत. या महान ग्रंथांतील
स्त्रियांची पात्रं केवळ कथेचे अंग नसून त्या त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक व
धार्मिक जाणिवांचे प्रतिबिंब आहेत. त्यांच्या जीवनगाथा समजून घेणे म्हणजे
तत्कालीन समाजाची मानसिकता, स्त्रीची भूमिका आणि तिच्या संघर्षांचे सम्यक
दर्शन घेणे होय.
'स्त्री जीवनाची गाथा-रामायण, महाभारत' हे अॅड.रुपेश पवार यांचे पुस्तक
या दोन्ही महाकाव्यांतील स्त्री पात्रांच्या जीवनाचे समतोल आणि संशयमुक्त विश्लेषण
करते. कौसल्या, सीता, उर्मिला, मंदोदरी, अंजना, शकुंतला, कुंती, द्रौपदी, गांधारी,
देवकी-यशोदा अशा दहा प्रमुख स्त्री व्यक्तिमत्त्वांचा वेध घेताना लेखकाने
त्यांच्याभोवती पसरलेले समज-गैरसमज दूर करत वाचकाला वस्तुनिष्ठ वास्तवाशी
भिडवले आहे. लेखक रुपेश पवार यांच्या अनेक पुस्तकांना वाचकांची पसंती
मिळालेली आहे. प्रत्येक वेळी नव्याचा शोध त्यांनी घेतलेला आहे. 'स्त्री जीवनाची
गाथा-रामायण, महाभारत' हे पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचावे.
लेखिका-निरूपणकार
प्रा.प्रज्ञा पंडित
Praise
